top of page
Writer's pictureMahannewsonline

'... BJP और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है'; नवाब मलिकांनी शेअर केला अमृता फडणवीसांचा फोटो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विट करत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मलिक यांनी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे.

या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्ती ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे. “चलो आज भाजपा और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है,” असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणाऱ्या व्यक्तीचं नाव जयदीप राणा असं असल्याची माहिती दिली. तसेच थोड्याच वेळात आपण पत्रकार परिषद घेणार असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.



bottom of page