top of page
Writer's pictureMahannewsonline

भाजपाने एका वर्षात प्रचारासाठी खर्च केले कोट्यवधी रुपये; रक्कम पाहाच

पश्चिम बंगालमध्ये तब्बल १५१ कोटी रुपये केले खर्च

२०२१ या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपाने प्रचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेली निवडणूक खर्चाची विवरणपत्रे निवडणूक आयोगाने आता सार्वजनिक केली आहेत. एकूण खर्चापैकी जवळपास ६० टक्के रकम ही पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी वापरली. भाजपाने याबद्दलचं विवरण निवडणूक आयोगाकडे सादर केलं आहे.

निवडणूक पॅनेलला सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या विवरणानुसार, भाजपाने ५ राज्यांच्या निवडणूक प्रचारासाठी तब्बल २५२ कोटी रुपये खर्च केले. आसाम निवडणुकीसाठी ४३.८१ कोटी, पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी ४ कोटी ७९ लाख रुपये, तामिळनाडूमध्ये २२ कोटी ९७ लाख रुपये, केरळमध्ये २९ कोटी २४ लाख खर्च केले. तर पश्चिम बंगालमध्ये तब्बल १५१ कोटी खर्च केल्याचे समोर आले.


bottom of page