top of page
Writer's pictureMahannewsonline

मुंबईतील शाळा ४ ऑक्टोबरपासून होणार सुरु

एका बेंचवर एक विद्यार्थी, पालकांची परवानगी गरजेची

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयं बंद ठेवण्यात आले आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असून ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरु करण्याला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग मार्गदर्शक सूचनांचं पालन करुन सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

काय आहे नियमावली ?

  • एका बेंचवर एक विद्यार्थी

  • शाळा प्रवेशासाठी पालकांची मंजुरी आवश्यक

  • सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील तर एक दिवस आड शाळा

  • एका दिवशी १५ ते २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश

  • सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक

  • मास्क परिधान करणे आवश्यक

  • सॅनिटायजर वापरणं गरजेचं


bottom of page