top of page
Writer's pictureMahannewsonline

Video: भलामोठा खडक बोटींवर कोसळल्याने सात पर्यटकांचा मृत्यू

धबधब्याखाली पाण्यात बोटीमध्ये बसून आनंद लुटत असतानाच अचानक भलामोठा खडक कोसळल्याने सात पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला असून नऊ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शनिवारी ब्राझीलमध्ये पर्यटकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कॅपिटोलियो कॅनयॉन (Capitolio Canyon) येथे घडली आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.याबाबतचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डोंगरावरील भलामोठा खडक दोन बोटींवर कोसळताना दिसत आहे. खडक कोसळत असल्याचं समजताच यावेळी तेथील काही बोटी दूर जाताना दिसत आहेत. मात्र दोन बोटींतील पर्यटकांना काही कळायच्या आत खडक त्यांच्या बोटीवर असल्याचे दिसत आहे, या दुर्घटनेत सात पर्यटकांचा मृत्यू झाला. तर तीन जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. इतका मोठा खडक अंगावर कोसळल्याने अनेकजण गंभीर असून कित्येक हाडं मोडली आहेत. अनेकांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. २३ जणांना किरकोळ जखमा असून उपचारानंतर त्यांना सोडण्यात आलं आहे.



bottom of page