top of page

अक्षय कुमारने पुन्हा वाढवलं मानधन

Image-empty-state.png

कोरोनामुळे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ठकलण्यात आल्या आहेत. अनेक निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांना कोरोनाचा फटका बसला असताना अक्षयची कमाई जोरदार सुरू आहे. इतकंच नव्हे तर त्याने मानधनाची रक्कम वाढवल्याची चर्चा आहे.

एका पाठोपाठ हिट चित्रपट देणारा अभिनेता अक्षयकुमारने त्याच्या मानधनाची रक्कम काही महिन्यापूर्वी ९९ कोटी रूपयांवरून १०८ कोटी रूपये केली होती. नुकत्याच साइन केलेल्या चित्रपटासाठी त्याने तब्बल ११७ कोटी रुपये घेतल्याचे समजते. आता अक्षयने २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाच्या मानधनाची रक्कम वाढवत १३५ कोटी रूपये इतकी केली आहे. अक्षय त्याचा खास मित्र व निर्माता फिरोज नाडियादवालासोबत काम करताना त्याचं मानधन कमी करतो असं म्हटलं जातं.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. त्याचा ‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट मार्च २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षयने ‘बेल बॉटम’चे शूटिंग पूर्ण केले आहे. तर ‘अतरंगी रे’, ‘पृथ्वीराज’, ‘राम सेतु’, ‘मिशन लायन’, ‘रक्षाबंधन’ अक्षयचे असे अनेक चित्रपट येत्या दोन वर्षात प्रदर्शित होणार आहेत.

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

rt__1609.jpg
bottom of page