top of page

दीपिकाचा सोशल मीडियाला रामराम?

Image-empty-state.png

दीपिका पादुकोणचे इन्स्टाग्राम अकाऊंट, ट्विटर तसेच फेसबुक पूर्णपणे रिकामे आहे. या तीन ही अकाऊंटवरच्या सगळ्या पोस्ट डिलीट झाल्याचे दिसत आहे. दीपिकाचे सोशल अकाऊंट अचानक अशापद्धतीने खाली झालेले पाहूनच साहजिकच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दीपिकाचे सोशल अकाऊंट हॅक झाले की काही तांत्रिक कारणाने असे झालेय? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण हिच्या डोक्यात चाललेय तरी काय? जुन्या सगळ्या आठवणी तिला पुसून काढायच्या आहेत ? का हा प्रमोशनचा फंडा आहे?

दीपिका सध्या रणथंबोर येथे पती रणवीर सिंगसोबत न्यू ईअर सेलिब्रेट करतेय. याचदरम्यान नवे वर्षाचे काऊंटडाऊन सुरु असताना दीपिकाच्या सर्व सोशल अकाऊंटच्या पोस्ट डिलीट झालेल्या दिसल्या. सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे पर्सनल फोटो, प्रोजेक्टबद्दलची माहिती असे सगळे ती शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर दीपिकाचे 52 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.ट्विटरवरही हजारो लोक तिला फॉलो करतात, मग अचानक दीपिकाने सगळ्या पोस्ट का डिलीट केल्यात? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

rt__1609.jpg
bottom of page