top of page

काजोलची ही एक गोष्ट अजिबात आवडत नाही...!

Image-empty-state.png

अजय देवगण-काजोल हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय कपल. त्यांच्या लग्नाला 20 वर्षांपेक्षाही अधिक काळ उलटून गेला तरीही दोघांच्या नात्यातील गोडवा जराही कमी झालेला नाही. खरे तर अजय व काजोल हे दोघेही परस्परांपेक्षा अगदी विरूद्ध. अजय काहीसा लाजरा, कमी बोलणारा तर काजोल नुसती बडबडी. काजोल यापूर्वी अनेकदा आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोललीये. पण अजय फार क्वचित पर्सनल लाईफबद्दल बोलतो. पण आता अजयने एक असा खुलासा केलाय, तो म्हणाला, काजोल मर्यादेपेक्षा अधिक बोलते. चित्रपटाच्या सेटवर असो की घरी तिची नुसती बडबड सुरु असते. तुम्ही तिला कितीही शांत बसायला सांगा, पण ती बडबड केल्याशिवाय राहूच शकत नाही. मात्र जेव्हा केव्हा ती शांत बसते, तेव्हा मलाच चुकल्यासारखे होते. ती शांत असलेली मला बघवत नाही. माझ्या मते, मला त्रास होत असला तरी काजोलने माझ्यासाठी कधीच बदलू नये.

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

rt__1609.jpg
bottom of page