top of page

कंगना रणौत साकारणार इंदिरा गांधींची भूमिका

Image-empty-state.png

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटात कंगना रणौत मुख्य भूमिका साकारणार आहे. कंगणानं व्टिट करत याबाबतची माहिती दिली आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकर भूमिका साकारणार असल्याचेही कंगनाने म्हटले आहे. हा सिनेमा एका पुस्तकावर आधारित असणार आहे.या चित्रपटाचे कथानक साई कबीर यांनी लिहिलेलं असून दिग्दर्शनही साई कबीरचं करणार आहेत.
‘इंदिराजी माझ्यासाठी एक आयकॉनिक महिला आहेत. त्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटात काम करण्यासाठी मी तयार आहे. त्यासाठी मी फोटोशूटही केले आहे. मी ज्यावेळी बॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली होती तेव्हा मला वाटले नव्हते की मी कधी इंदिरा गांधींची भूमिका साकारेन.' असं व्टिट कंगणानं केलं आहे.

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

rt__1609.jpg
bottom of page