top of page

काय झाले असे की, प्रियांका चोप्राने निक जोनसला कारमधून बाहेर काढलं !

Image-empty-state.png

काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. या दरम्यान दोघांनी लग्नाचे चाहत्यांनी कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले होते. फक्त खास दिवशीच नाही तर दोघं अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात.आता प्रियांका एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. या चर्चा तिने निकला गाडीतून खाली उतरण्यास सांगितल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

या चर्चा प्रियांकाने निकला अपशब्दांचा वापर करत कारमधून उतरण्यास सांगितल्यामुळे सुरु झाल्या आहेत.. पण हे सगळं खासगी आयुष्यात नाही तर एका सिनेमातील सीनमध्ये केलं. प्रियांका सध्या लंडनमध्ये टेक्स्ट फॉर यू या तिच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात ती व्यस्त आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस टेक्स्ट फॉर यू सिनेमात एकत्र दिसणार आहेत आणि प्रियांका निकला गाडीतून ढकलते हाही या सिनेमाचा एक भाग आहे.

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

rt__1609.jpg
bottom of page