top of page
Writer's pictureMahannewsonline

प्रेमात धोका; प्रेयसीसह तिघांची हत्या करून केली आत्महत्या

इंदूर : प्रेयसीने धोका दिल्याने एका तरुणाने प्रेयसीसह तिघांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतःही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बैतूल (मध्यप्रदेश) जिल्ह्यातील एका गावात घडली. हे हत्याकांड करण्यापूर्वी पूर्वी आरोपी भानु ठाकूर याने २.५० मिनिटांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानू ठाकूर आणि बैतूलच्या आमला परिसरातील बरखा सोनी यांचे सात वर्षांपासून प्रेम होते. मात्र बरखाच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाला विरोध होता. यामुळे भानु आणि बरखा यांच्यामध्ये बरेच दिवस वाद सुरू होता. अखेर बरखाने त्याच्यासोबतचे नाते तोडले. बरखाच्या घरच्यांनी भानु ठाकूर विरोधात आमला पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती, त्यावरून पोलिसांनी भानु ठाकूर विरोधात कारवाई केली होती.

शनिवारी दुपारी संतापलेला भानू बंदुक घेऊन बरखाच्या घरात गेला आणि त्याने बरखासह तिच्या मामाचा मुलगा लोकेश आणि शेजाऱ्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.


हत्याकांडापूर्वी आरोपी भानु ठाकूर यांने २.५० मिनिटांचा एक व्हिडीओ केला होता. या व्हिडीओमध्ये आरोपी त्याने सांगितले होते की, आपले आणि बरखाचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते, मात्र आता ब्रेकअप झाले. मी हे दु:ख सहन करू शकत नाही. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला. म्हणूनच आता टोकाचे पाऊल उचलणार आहे आणि या घटनेनंतर त्याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला त्रास देऊ नये. कारण हे सगळं तो जाणीवपूर्वक करत असल्याचे त्याने त्यात म्हंटले आहे.

bottom of page