top of page
Writer's pictureMahannewsonline

जनरल बिपिन रावत हेलिकॉप्टर दुर्घटना; अपघाताचे कारण आले समोर

तामिळनाडूमधील कुन्नूर येथे ८ डिसेंबर २०२१ रोजी भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १४ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर हा अपघात कसा झाला, या सर्वांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. आता यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीने अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल न्यायालयात सादर केला असून अपघातामागील कारणांचा उलगडा झाला आहे.

हेलिकॉप्टरचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरचाही अभ्यास केला. याशिवाय सर्व साक्षीदारांचे जबाबही घेण्यात आले. चौकशीत अपघातामागे मेकॅनिकल फेल्युअर म्हणजेच यांत्रिक बिघाड, घातपात किंवा दुर्लक्ष अशी कारणं नसल्याचं म्हणत त्या शक्यता फेटाळल्या आहेत. या अहवालात हेलिकॉप्टरच्या अपघाताला अचानक बदललेलं हवामान आणि त्यानंतर हेलिकॉप्टरचा ढगांमध्ये घुसल्याने हा अपघात झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. कोर्ट ऑफ इंक्वायरीने चौकशी अहवालातील माहितीच्या आधारे काही शिफारसी देखील केल्या आहेत.


bottom of page