top of page
Writer's pictureMahannewsonline

लग्नाच्या एक दिवस आधीच वधुचा झाला मृत्यू

कोल्हापूर : जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे लग्नाच्या एक दिवस आधीच वधूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

संजना वेर्णेकर असं मृत पावलेल्या वधुचं नाव आहे. गडहिंग्लज येथील संकेश्वर रोड परिसरात राहणाऱ्या संजना हीचा वास्तव्याला होते. काही दिवसांपूर्वी विवाह ठरला होता. त्यामुळे घरात लग्नाची तयारी जोरात सुरू होती. अशातच गुरुवारी सकाळी वेर्णेकर कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडलं आहे. गुरुवारी सकाळी संजना पाणी आणण्यासाठी गेली असता, ती पाण्याच्या टाकीत पडली. पाण्यासाठी गेलेली संजना बराच वेळ झालं तरही परत आली नसल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. यावेळी पाण्याच्या टाकीत संजनाचा मृतदेह आढळून आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच गडहिंग्लज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हा निव्वळ अपघात आहे की घातपात? त्याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.


bottom of page