top of page
Writer's pictureMahannewsonline

बसपा : पंजाबमध्ये आघाडी तर उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये स्वबळावरच लढणार

बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावरच लढणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. काही दिवसांपासून बसपा व एमआयएम यांच्यात आघाडी होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या, मात्र यामध्ये काहीच तथ्य नसल्याचं मायावतींनी सांगितलं आहे. मायावतींनी ट्विट करत ही माहिती दिली

”माध्यामातील एक वृत्तवाहिनीकडून कालपासून अशी बातमी दाखवली जात आहे की, उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभेची निवडणूक ओवेसींचा पक्ष एमआयएम व बसपा एकत्र मिळून लढणार आहेत. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे, अफवा पसरवणारे, तथ्यहीन आहे. यामध्ये काडीमात्रही सत्य नाही. बसपा या वृत्ताचे खंडण करते.” असं मायावतींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये ”या संदर्भात पार्टीकडून पुन्हा असं स्पष्ट केलं जातं की, पंजाब सोडून उत्तरप्रदेश व उत्तराखंड मधील पुढील वर्षी सुरू होणाऱ्या विधानसभेची निवडणूक बीएसपी कोणत्याही पक्षाशी आघाडी करून लढणार नाही. म्हणजे, स्वबळावरच निवडणूक लढणार.”असं म्हटलं आहे

पंजाबमध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होत असून, अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.


bottom of page