top of page
Writer's pictureMahannewsonline

प्रवाशांनी भरलेली बस उलटली; विद्यार्थ्यांसह आठ जणांचा मृत्यू; २० जखमी

कर्नाटकातील तुमकूर येथील पावागडजवळ शनिवारी बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले असून ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जातंय.

हा अपघात एवढा भीषण होता की, यामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिकांनी आणि प्रशासनाने तात्काळ नजीकच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी असलेल्यांमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. बसमध्ये जवळपास ६० प्रवासी होते.




bottom of page