top of page

पुण्यात बस कंडक्टरने केला अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा कंडक्टरने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. स्वारगेट ते विश्रांतवाडी प्रवासादरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत किसन गोडगे असे कंडक्टरचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय अल्पवयीन तरुणी काल (सोमवार ) दुपारी स्वारगेट ते विश्रांतवाडीदरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करीत होती. त्यावेळी कंडक्टर प्रशांत किसन गोडगे तिच्या बाजूला थांबून “तुला बाजूला उभा राहण्यास जागा नाही का?”असे म्हणाला. यावर ती तरुणी काहीच बोलली नाही आणि बाजूला उभी राहिली. त्यानंतर काही वेळाने बसमध्ये आलेल्या तिकीट चेकरकडे या तरुणीने आरोपीबाबत तक्रार केली. याबद्दलचा राग मनात धरून कंडक्टर तरुणीच्या बाजूला उभा राहीला आणि या तरुणीच्या कमरेला हात लावला. हा प्रकार आरोपीने तीन वेळा केला. या घटनेबाबत १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी तातडीने पीएमपीएमएल बसच्या या कंडक्टरला अटक केली असून अधिक तपास करण्यात येत आहे.


bottom of page