top of page

४० प्रवाशांसह बस नदीत कोसळली; व्हिडिओ पहा ...

 ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोखराहून काठमांडूच्या दिशेने जाताना भारतीय प्रवासी असलेल्या या बसला अपघात झाला आणि बस थेट नदीत कोसळली. या भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून अनेकजण गंभीर जखमी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मृतांचा तसंच जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. एएनआयने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, २३ ऑगस्ट रोजी सकाली साडे अकराच्या सुमारास ही अपघाताची घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ४० भारतीयांना घेऊन ही बस (क्रमांक UP FT 7623 ) पोखराहून काठमांडूला निघाली होती. त्यावेळी मार्स्यांगडी नदीत ही बस कोसळली. बस ज्या ठिकाणी पडली तिथे नदीची पाणी पातळी पावसामुळे वाढली आहे.

या बसमधून तसंच नदीच्या पात्रातून प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या ठिकाणी ४५ जणांचं बचाव पथक पोहचलं आहे. नेपाळ सशस्त्र पोलीस दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक या ठिकाणी आहे.





bottom of page