top of page
Writer's pictureMahannewsonline

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार : ४३ मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; खातेवाटप जाहीर

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज एकूण ४३ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील ४ खासदारांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ४३ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यात नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांचा समावेश आहे.

आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कार्मिक, पेन्शन आणि नागरी तक्रारी खात्यासह ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयावर लक्ष ठेवतील. तर अमित शहांकडे गृहमंत्रालयासह सहकार मंत्रालयाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे.


कोणतं खातं कुणाकडे …

कॅबिनेट मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी – विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय (अतिरिक्त भार)

मनसुख मांडवीय – आरोग्य मंत्री, रसायन मंत्री

अमित शाह – सहकार मंत्री (अतिरिक्त भार)

ज्योतिरादित्य सिंदिया – हवाई वाहतूक मंत्री

अनुराग ठाकूर – माहिती व प्रसारण मंत्री, युथ अफेअर्स

हरदीप पुरी – नागरी विकास, गृहनिर्माण आणि पेट्रोलियम मंत्री

नारायण राणे – मध्यम व लघु उद्योग मंत्री

धर्मेंद्र प्रधान – शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री

अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्री आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री

पियुष गोयल – उद्योगमंत्री

स्मृती इराणी – महिला व बाल कल्याण मंत्री

सरबानंद सोनोवाल – बंदर आणि जलवाहतूक मंत्री, आयुष मंत्रालय

पशुपतीकुमार पारस – अन्न प्रक्रिया मंत्री

गजेंद्रसिंह शेखावत – जलशक्ती मंत्री

पुरुषोत्तम रुपाला – मासेमारी, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्र

राज्यमंत्री

भगवंत खुबा – अपारंपरिक उर्जा विभाग आणि खते-रसायन विभाग राज्यमंत्री

कपिल पाटील – पंचायती राज राज्यमंत्री

प्रतिमा भौमिक – सामाजिक न्याय राज्यमंत्री

सुभास सरकार – शिक्षण राज्यमंत्री

राजकुमार रंजन सिंह – परराष्ट्र विभाग आणि शिक्षण राज्यमंत्री

भारती पवार – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री

विश्वेश्वर टुडू – आदिवासी विकास आणि जलशक्ती विभाग राज्यमंत्री

शांतनु ठाकूर – बंदर, जलवाहतूक राज्यमंत्री

मुंजपरा महेंद्र – महिला व बालकल्याण आणि आयुष विभाग राज्यमंत्री

जॉन बारला – अल्पसंख्याक राज्यमंत्री

एल. मुरुगन – मासेमारी, पशुपाल आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री, माहिती व प्रसारण राज्यमंत्री

निसिथ प्रामाणिक – गृह राज्यमंत्री, युवा आणि क्रीडा राज्यमंत्री

अनुप्रिया पटेल – उद्योग राज्यमंत्री

एस. पी. बघेल – कायदा व न्याय राज्यमंत्री

राजीव चंद्रशेखर – कौशल्य विकास, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री

शोभा करंदलजे – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री

दर्शन जरदोश – टेक्स्टाईल, रेल्वे राज्यमंत्री

व्ही. मुरलीधरन – परराष्ट्र, संसदीय कार्य राज्यमंत्री

मीनाक्षी लेखी – परराष्ट्र, सांस्कृतिक राज्यमंत्री

अन्नपूर्णा देवी – शिक्षण राज्यमंत्री

अजय भट – संरक्षण, पर्यटन राज्यमंत्री

अजय कुमार – गृह राज्यमंत्री


bottom of page