top of page
Writer's pictureMahannewsonline

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन ...

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या एका निनावी एका फोनमुळे मंत्रालयात काही वेळ दहशतीचं वातावरण पसरलं होतं, आज दुपारी एकच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षात अज्ञात व्यक्तींनं फोन करुन बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. बॉम्बशोधक पथकही तात्काळ घटनास्थळी पोहचले . बॉम्बशोधक पथकाने मंत्रालयातील संपूर्ण परिसरात शोध घेतला असता त्यांना कोणतीही बॉम्बसदृश गोष्ट या ठिकाणी आढळली नाही.

निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ हालचाली करत संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. दरम्यान पोलिसांना ज्या क्रमांकांवरून फोन आले त्यांची माहिती पोलीस घेत आहेत. ही अफवा ज्याने पसरवली त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. कोरोनामुळे मोजकेच कर्मचारी मंत्रालयात उपस्थित असतात. त्यामध्ये आज रविवारी असल्याने मंत्रालयात लोकांची वर्दळ अगदी कमी होती, अन्यथा एकच गोंधळ उडाला असता.


bottom of page