top of page
Writer's pictureMahannewsonline

धावत्या कारची स्टेअरिंग झाली लॉक अन् गाडी थेट ...

धावत्या कारचे स्टेअरिंग अचानक लॉक झालं. नेमकं काय झालं ते कळेपर्यंत चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली. या अपघातात एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा नोएडा शहरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैवाल भटनागर हे इंजिनियर असून ते आपल्या पत्नी शिखा भटनागर समवेत ग्रेटर नोएडा वेस्ट येथील पंचशील ग्रीन्स सोसायटीमध्ये राहतात. शिखा होमियोपॅथिक डॉक्टर होत्या. गुरुवारी रात्री उशिरा पती-पत्नी काही कामानिमित्ताने कारने गेले होते. पती शैवाल हे गाडी चालवित होते. काम आटपून घरी घरी परतत असताना गाडी चालवत होते. ते १३० मीटर रोडवर एच्छर पोलीस ठाण्याजवळ त्यांच्या कारची स्टेअरिंग अचानक लॉक झाली. त्यामुळे शैवाल यांचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी थेट दुभाजकाला जाऊन धडकली.

या दुर्घटनेत शैवाल आणि त्यांची पत्नी शिखा जखमी झाले. पण शिखा यांनी सीट-बेल्ट न घातल्यामुळे त्यांना जास्त इजा पोहोचली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी भटनागर दाम्पत्याला गाडीतून बाहेर काढत जवळील कैलाश रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी शिखा भटनागरला हिला मृत घोषित केलं. तर पती शैवाल भटनागर यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं.


bottom of page