top of page
Writer's pictureMahannewsonline

...आता न्यायपालिकाही हातात आहे असं त्यांना सुचवायचं आहे का?

पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जींचं कौतुक केलं होतं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जींना झाशीच्या राणीची उपमा दिली होती. यामुळे संतापलेल्या चंद्रकांत पाटील यांनी जामीनावर सुटला आहात, अजून निर्दोष सिद्ध झालेला नाहीत. त्यामुळे फार जोरात बोलू नका, अन्यथा फार महागात पडेल अशी धमकीच भुजबळांना दिली. यावर एबीपी माझाशी बोलताना भुजबळ यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून भाजपवर निशाणा साधला आहे.

"माझ्यावरील केसेस कोर्टात आहेत. तरीही ते महागात पडेल आणि भारी पडेल असं बोलतात. याचा अर्थ काय समजायचा? सीबीआय, ईडी या यंत्रणाप्रमाणेंच न्यायपालिका ताब्यात घेतली की काय असं त्यांना सुचवायचं आहे का? असे प्रश्न भुजबळ यांनी विचारले. "आमच्या तारखा सुरुच आहे. आमच्यामागे एक नाही सात-आठ केस आहेत. सगळीकडे आम्ही जात असतो आणि पुरे पडत असतो, काळजी करु नका," असंही भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.


चंद्रकांत पाटील यांनी पराभव सहन करण्याची तयारी ठेवायला हवी. यापुढेही वारंवार असे धक्के बसतील. त्यामुळे त्यांनी पराभव सहन करण्याची शक्ती ठेवून सांभाळून बोललं पाहिजे," असा सल्ला भुजबळ यांनी दिला.


bottom of page