top of page

VIDEO : १० वर्षीय मुलीच धाडस... अन् चोराने ठोकली धूम

रस्त्यावरून जाणाऱ्या आजीच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराचा प्रयत्न १० वर्षांच्या नातीने उधळून लावला. साखळीचोर आजीच्या गळ्यातील दागिने ओढत असल्याचं दिसताच १० वर्षाच्या मुलीने धाडस करत हातातील बॅगने चोरावर हल्ला चढवला. आजी आणि या मुलीच्या प्रतिकारामुळे अखेर त्या चोराला पळ काढावा लागला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काल ( ९ मार्च ) अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ पाहा :

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २५ फेब्रुवारी रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी परिसरात घडली. लता घाग (वय ६०) या आपल्या नातींसोबत घरी जात होत्या. त्यावेळी एक दुचाकीस्वार पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ आला. आणि लता घाग यांच्या गळ्यातली चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. यानंतर लता घाग सावध झाल्या आणि त्यांनी साखळीचोराचा प्रतिकार केला. त्यांच्या सोबत असलेली १० वर्षीय नातं रुतवी घाग हिने प्रसंगावधान राखत तिच्या हातातील बॅगने साखळीचोरावर हल्ला चढवला. आजींसह नातीनेही चोरावर हल्ला चढवल्याने चोर भांबावला आणि त्याने दागिने न चोरताच तेथून पळ काढला.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून १० वर्षीय मुलीच्या धाडसाचं चांगलंच कौतुक होताना दिसत आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिस पीडितांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी ९ मार्च रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


bottom of page