top of page
Writer's pictureMahannewsonline

श्रमदानातून लोहारा तलाव परिसर झाला स्वच्छ; रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन संस्थेचा पुढाकार

चंद्रपुर: येथील लोहारा ग्रामपंचायत परिसरात असलेला लोहारा तलाव येथे नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात. परंतु काही पर्यटक प्लास्टिकचे रॅपर, प्लास्टिकचे पत्रावळी, प्लास्टिकचे बॉटल, प्लास्टिकचे ग्लास, काचाचे बॉटल इत्यादी येथेच टाकून देतात त्यामुळे लोहारा तलावाचा व निसर्गाचा आनंद घेणाऱ्या इतरांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास ओळखून रक्षण धरणीमातेचे फाउंडेशनच्या सदस्यांनी श्रमदान करून परिसराची स्वच्छता केली.

यावेळी परिसरातील कचरा गोळा केला त्यामुळे येणारा पर्यटकाला सुविधा झाली आहे. दर रविवारी विविध ठिकाणी मंदिरे ,सामाजिक स्थळे, शासकीय कार्यालय, पर्यटन स्थळ इत्यादी स्थळांची स्वच्छता मोहीम मागील तीन वर्षापासून करण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा असे संस्थेचे सदस्य आकाश नवले यांनी व्यक्त केले. श्रमदानासाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल कोटकर, राजीव शेंडे, आकाश नवले ,सुरज हजारे, सुरज नवले, विशाल पेंदोर, हरप्रीत सिंग,गौरव वरारकर, मृणाल वडगावकर, नंदकिशोर बलारवार, माधुरी शेंडे,रश्मी कोटकर,भूषण सोनकुसरे,विजय मोहरे,हर्ष पेंदोर,रिदम कोटकर आदींनी सहभाग घेतला.


bottom of page