top of page
Writer's pictureMahannewsonline

लहान मुलांना रेमडेसिविर देऊ नका; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

लहान मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना संसर्ग झालेल्या लहान मुलांच्या उपचारासाठी गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून सविस्तरपणे देण्यात आलेल्या या मार्गदर्शक तत्वांमध्ये १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये रेमडेसिविरच्या संदर्भात पुरेसी सुरक्षितता आणि कार्यक्षमतेचा पुरेसा डेटा उपलब्ध नसल्याने लहान मुलांसाठी रेमडेसिविरची शिफारस करण्यात आलेली नाही. तसंच रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांसाठीच औषधांचा वापर केला जावा असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक तत्वे ( गाईडलाइन्स ):

  • कोरोनामुळे प्रकृती गंभीर असल्यास ऑक्सिजन थेरपी त्वरित सुरू केली जाणं आवश्यक

  • द्रव आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखले जाणं आवश्यक

  • कॉर्टिकोस्टेरॉईड थेरपी सुरू केली जावी

  • लक्षणं नसणाऱ्या किंवा सौम्य करोना केसेसमध्ये उत्तेजक (स्टिरॉईड) धोकादायक ठरु शकतात यामुळे त्यांना केवळ रुग्णालयात दाखल गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांनाच डॉक्टरांच्या देखरेखीखाली देण्यात यावं

  • स्टिरॉईड योग्य वेळेवर, योग्य प्रमाणात आणि योग्य काळापुरती घेतली जावीत,

  • १२ वर्षांपुढील मुलांची प्रकृती तपासण्यासाठी सहा मिनिटं वॉकची शिफारस करण्यात आली आहे. मुलांच्या बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यांना सलग ६ मिनिट चालण्यास सांगितलं आहे. यादरम्यान त्यांची ऑक्सिजन पातळी 94 टक्क्यांची खाली जाते किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला तर मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले जावे.अनियंत्रित अस्थमा असणाऱ्यांसाठी या टेस्टची शिफारस करण्यता आलेली नाही.

  • ५ वर्षांखालील मुलांना मास्क लावू नका

  • ६ ते ११ वर्षांमधील मुलांना आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मास्क घालावेत

  • डॉक्टरांना अत्यंत गरज असेल तरच करोना पॉझिटिव्ह लहान मुलांना सीटी स्कॅनसाठी सांगण्यात यावं


bottom of page