top of page
Writer's pictureMahannewsonline

हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं !

पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात ही घटना घडली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ हा व्हायरल झाला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता महिला सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे. भाजपा उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करत याबाबत संताप व्यक्त केला असून हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं असल्याचं म्हटलं आहे.

“पुण्याजवळील कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली आहे. मारहाण करणारा कोण? तर तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा. गृहखातं ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना गलीच्छ शिवीगाळ करणे, त्यांना ॲट्रोसिटीच्या धमक्या देणे, महिला सरपंचाला मारहाण करणे याचं लायसन्स दिलयं का ?” अशी सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.


bottom of page