top of page
Writer's pictureMahannewsonline

... लसीकरणासाठी 'अभिनेत्री' झाली 'सुपरवायझर'

सध्या राज्यात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. लस तुटवड्यामुळे १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. असे असताना ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा कोरोना रुग्णालयात ३६ वर्षांच्या एका अभिनेत्रीला लस देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मीरा चोप्रा असे या अभिनेत्रीचे नाव असून तिने सोशल मिडीयावर लसीकरणाचा फोटो पोस्ट केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मीरा चोप्राने फ्रंट लाईन वर्कर असल्याचे भासवून लस घेतली आहे. ठाणे महापालिकेस मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंत्राटदार कंपनीनेच या अभिनेत्रीला 'सुपरवायझर' या आरोग्यसेवक पदाचे ओळखपत्र दिल्याचे समोर आले आहे.

राज्यात सर्वत्र लसींचा तुटवडा असल्यामुळे १ मे पासून सुरू केलेले १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सरकारने थांबविले. कोविन अ‍ॅपमध्येही या वयोगटासाठी लसीकरणाचे बुकिंग केले जात नाही. मात्र शुक्रवारी अभिनेत्री मीरा चोप्राने लसीकरण केल्याचे सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर केले. वय कमी असतानाही लस कशी मिळाली ? अशा शंका विचारण्यास सुरुवात झाली होती. तर एका व्यक्तीने संबंधित अभिनेत्रीने पार्किंग प्लाझा रुग्णालयात कर्मचारी असल्याचे ओळखपत्र सादर केल्याचे स्पष्ट करत त्या ओळखपत्राचा फोटो टाकला. त्यामुळे या अभिनेत्रीच्या लसीकरणाची चर्चा ठाणे शहरात सुरू झाली.


लसीकरणावरून वाद निर्माण झाल्यानंतर अभिनेत्री मीरा चोप्राने सोशल मीडियावरील ट्वीट डिलीट केले,


bottom of page