top of page
Writer's pictureMahannewsonline

जिल्हाधिकाऱ्यांच्या "त्या" व्हायरल व्हिडिओची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल ...

सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका युवकाचा मोबाईल फोडून त्या युवकाच्या कानाखाली लगावल्याचा व्हिडिओ काल (शनिवार ) पासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओची दखल थेट छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी घेतली. व्हिडिओमध्ये तरुणाला कानाखाली लगावणाऱ्या सूरजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांना या गैरवर्तणुकीबद्दल तातडीने पदावरून हटवल्याचं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान यासंदर्भात आयएएस अधिकारी रणबीर शर्मा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून माफी देखील मागितली आहे.

“सोशल मीडियावर सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांच्याकडून एका तरुणाशी गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही एक दु:खद आणि निंदनीय घटना आहे. छत्तीसगडमध्ये असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. रणबीर शर्मा यांना तातडीने हटवण्याचे निर्देश देण्या आले आहेत”, असं ट्वीट मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केलं आहे.


bottom of page