top of page
Writer's pictureMahannewsonline

मोदींनी सगळं गांभीर्याने ऐकून घेतलंय...

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत राज्यातील विविध प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास पावणेदोन तास चर्चा केली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचं सर्व म्हणणं गांभीर्याने ऐकून घेतले आहे. आता ते या सगळ्यावर सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा आम्हाला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्रत्येक विषयाचे विस्तृत पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी मी या सगळ्याची माहिती घेऊन त्यामध्ये लक्ष घालतो, असे आश्वासन दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

या बैठकीत मराठा आरक्षण, इतर मागासवर्ग आरक्षण, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय, जीएसटीचा विषय, शेतकऱ्यांच्या पीक कर्ज ,पीक विमा, चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी, मराठा भाषेला अभिजात दर्जा मिळावा आदी विषयांवर चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा समावेश होता. यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्राने महाराष्ट्राला जीएसटी थकबाकीची रक्कम तातडीने अदा करावी, अशी मागणीही केल्याचे समजते.


bottom of page