top of page
Writer's pictureMahannewsonline

देशात कोरोनाबळींचा उच्चांक

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले असून जगातील विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली. देशात गेल्या महिनाभरापासून दररोज चार हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. गेल्या २४ तासांतील मृत्यूची आकडेवारीही भयावह असून एका दिवसात तब्बल 4 हजार 529 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. हा एका दिवसातील कोरोनाबळींचा विक्रम आहे. महाराष्ट्र, दिल्लीत उद्रेक झाल्यानंतर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये करोना परिस्थिती बिकट बनली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील २४ तासांत म्हणजे मंगळवारी दिवसभरात २ लाख ६७ हजार ३३४ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात 2 लाख 67 हजार 334 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 529 रुग्णांना प्राण गमवावे लागले. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ६७९ मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक ५२५, तामिळनाडू ३६४ या राज्यांचा क्रमांक आहे. देशात काल दिवसभरात 3 लाख 89 हजार 851 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.


भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 54 लाख 96 हजार 330 वर गेला आहे. देशात 2 कोटी 19 लाख 86 हजार 363 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 लाख 83 हजार 248 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 32 लाख 26 हजार 719 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 18 कोटी 58 लाख 9 हजार 302 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


bottom of page