top of page
Writer's pictureMahannewsonline

कोरोनावरील औषधे करमुक्त

नवी दिल्ली :कोरोनावरील टोसिलिझुमॅब आणि ‘म्युकरमायकोसिस’वरील अ‍ॅम्फोटेरिसिन-बी या औषधांना वस्तू आणि सेवाकरातून मुक्त करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. लशींवरील ५ टक्के कर मात्र कायम ठेवण्यात आला असून प्राणवायू, प्राणवायूनिर्मिती उपकरणांवरील कर ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

वैद्यकीय प्राणवायू, देशी बनावटीची वा आयात केलेली प्राणवायू विलगीकरण यंत्रे, श्वसन यंत्रे, श्वसन यंत्रांचे मुखकवच, कॅन्युला (नळी), हेल्मेट, बी-पॅप यंत्र, नेझल कॅन्युला, नमुना चाचणी संच, ऑक्सिमीटर, तापमापक, हात जंतूरोधक, विद्युतदाहिनीसाठी वापरले जाणारे साहित्य आदींवरील जीएसटीही १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणला आहे.

बहुतांश राज्यांनी लशींवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर निर्णय घेण्यासाठी परिषदेने राज्यांच्या अर्थमंत्र्यांची विशेष समिती नेमली होती. या समितीने लशींवरील जीएसटी दर कमी न करण्याचा अहवाल दिल्याने कोरोना प्रतिबंधक लशींवरील पाच टक्के जीएसटी दर कायम ठेवण्यात आला आहे.


bottom of page