top of page
Writer's pictureMahannewsonline

भारतासाठी एक धोक्याचा इशारा !

जूनच्या पहिल्या आठवड्यात रोज २ हजार २३० जणांचा होऊ शकतो मृत्यू

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रचंड उद्रेक झाल्यानंतर दिवसेंदिवस बाधितांची तसेच मृत्यूची संख्या वाढत आहे. देशात गुरुवारी आतापर्यंतची उच्चांकी कोरोना रुग्णसंख्या नोंदवली गेली असून १०३८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात आता कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात जूनमध्ये दररोज २ हजार ३२० जणांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. हा भारतासाठी एक धोक्याचा इशाराच आहे.


भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दररोज १ हजार ७५० लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात दररोज २ हजार ३२० लोक कोविडमुळे मरण पावतील, असं इंडिया टास्क फोर्स सदस्यांच्या आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे. ‘लॅन्सेट’मध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.


‘भारतातील दुसऱ्या कोरोना लाटेच व्यवस्थापन : तातडीचे उपाय’ या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात कोरोना संक्रमणाचा वेग कमी करण्यास परिणामकारक ठरणाऱ्या उपाययोजनांचीही शिफारस करण्यात आली आहे.


bottom of page