top of page

Video : प्रेमी युगलाचं भांडणं सोडवायला गेलेल्या डिलीव्हरी बॉयने तरुणीला भररस्त्यात...

नवरा-बायको असो वा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड यांच्या वादात सहसा कोण पडत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी तर अशी भांडण होत असेल तर तिथे बघ्यांची गर्दी ही होतेच. असाच एक प्रकार ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे घडला. भर रस्त्यात सुरु असलेल्या प्रेमी युगलाच्या भांडणात हस्तक्षेप करत मुलीला शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीनेच मुलीला भररस्त्यात मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे



भुवनेश्वर येथे भर रस्त्यात एक प्रेमी युगल भांडण करत होतं. याचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले असून पहिल्यात व्हिडिओत गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंडबरोबर भांडताना दिसत आहे. तसंच त्याला शिवीगाळ करताना दिसत आहे. गर्लफ्रेंड जोरजोरात आरडाओरडा करत असल्याने गर्दी जमते, पण बॉयफ्रेंड सर्व शांतपणे ऐकून घेत असतो. याच दरम्यान ती रस्त्याच्या कडेला पडलेला दगड देखील उचलते आणि बॉयफ्रेंडच्या स्कुटरवर मारते.

तर दुसऱ्या व्हिडिओत प्रेमी युगलाचं भांडण सुरु असतानां तिथून जाणारा एक फूड डिलिव्हरी बॉय हे भांडण मिटविण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यांच्या हस्तक्षेप करत मुलीला शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण तरुणी कुणाचंच ऐकत नव्हती. त्या मुलीने मध्यस्थी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयलाच शिवीगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या डिलिव्हरी बॉयने भर रस्त्यात मुलीला मारहाण केली. त्यानंतर तिथं उपस्थित एक व्यक्ती डिलीव्हरी बॉयला थांबवते. त्याला शांत करते. त्यानंतर तरुणीही तिथून निघून जाते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.




bottom of page