top of page
Writer's pictureMahannewsonline

सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

देशभरात निर्माण झालेल्या आरोग्य सुविधांचा तुटवडा आणि त्यासंबंधी अनेक राज्यांमधील उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणींची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली असून केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सुप्रीम कोर्टाने कोरोनाशी लढण्यासाठी देशपातळीवर काय तयारी केली, याची माहिती देण्यास सांगितलं आहे.

कोरोनाच्या तयारीसंबंधी सध्या सहा राज्यांमधील उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने याची दखल घेतली. ऑक्सिजनचा पुरवठा, महत्वाच्या औषधांचा पुरवठा, लसीकरणाची पद्धत आणि लॉकडाउन जाहीर करण्याचा अधिकार या चार मुद्द्यांवर केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे. तसेच सरन्यायाधीशांनी यावेळी लॉकडाउन जाहीर करण्याचा अधिकार राज्यांकडे असावा आणि न्यायालयांनी यावरुन मत प्रदर्शित करु नये असं सांगितलं.


bottom of page