top of page
Writer's pictureMahannewsonline

भ्रष्टाचाराचा आरोप; ब्राझीलकडून कोवॅक्सिनसोबतचा करार रद्द

भारत बायोटेक कंपनीसोबतचा ३२ कोटी डॉलरचा करार रद्द केल्याची घोषणा ब्राझीलचे आरोग्यमंत्री मार्सेलो यांनी आज केली आहे. ब्राझीलमध्ये भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या करारावरून मोठा गदारोळ सुरू होता. या करारानुसार, ब्राझील सरकार भारत बायोटेक कंपनीकडून कोवॅक्सिन लशीचे दोन कोटी डोस खरेदी करणार होते. मात्र, या करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर राष्ट्रपती बोल्सनारोदेखील अडचणीत आले होते.

संसदीय समितीच्या चौकशीत ब्राझील सरकारने कोवॅक्सिन लस अधिक दरात खरेदी करण्यात आली असल्याचे दिसून आले. त्यानंतर ब्राझील सरकारच्या या करारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. फायजर कंपनीने ब्राझील सरकारला कोवॅक्सिनपेक्षा कमी दरात लस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, ब्राझील सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती बोल्सनारो यांनी आरोप फेटाळून लावले होते. कोवॅक्सिन लशीवर एक पैसा खर्च केला नाही आणि आम्हाला कोवॅक्सिन लशीचा एकही डोस मिळाला नाही. त्यामुळे भ्रष्टाचार झाला कुठे, असा उलट प्रश्न राष्ट्रपती बोल्सनारो यांनी केला.


bottom of page