top of page
Writer's pictureMahannewsonline

Covid 19 : देशातील निर्बंध ३० जूनपर्यंत कायम; केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात लावण्यात आलेले कठोर निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली असल्याने अनेक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवे तसंच सक्रिय रुग्णसंख्या कमी झाली असल्याचं केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी म्हटलं आहे.

कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी सक्रिय रुग्णसंख्या अद्यापही जास्त आहे.. त्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणीही चालू ठेवणे आवश्यक असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान स्थानिक परिस्थिती, गरजा आणि संसाधनांचा आढावा घेतल्यानंतर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेऊ शकतात, असं आदेशात सांगण्यात आलं आहे.


२९ एप्रिलच्या आदेशात गृहमंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर कठोर निर्बंध लावण्याची सूचना केली होती. गेल्या एक आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त असणाऱ्या जिल्ह्यांची माहिती घ्या असंही यावेळी सांगण्यात आलं होतं.


bottom of page