top of page
Writer's pictureMahannewsonline

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवलं!

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार गटानं सल्ला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवडे इतकं होतं. आता ते अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार गटानं सुचवलेल्या शिफारशी नॅशनल टेक्निकल अडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन अर्थात NTAGI कडे पाठवण्यात आल्या होत्या. त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, कोवॅक्सिन लसीच्या डोससाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.



bottom of page