top of page
Writer's pictureMahannewsonline

... दाम्पत्याने केली पोलिसाला मारहाण

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण भागात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. यादरम्यान वाहन चालकांची तपासणी केली जात आहे. यावेळी पोलिसाने एका दुचाकीस्वाराला कागदपत्रं मागितली असता दुचाकीस्वाराने पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घालत त्याच्या हाताचा चावा घेतला.तर त्याच्या पत्नीने फळीने मारहाण केल्याची घटना घडली. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळून उद्धव भोसले आणि त्यांची पत्नी कुंदनबाई हे दुचाकीवरून जात होते. तेव्हा तिथे गुन्हे शाखेचे सचिन दिलीप पवार कर्तव्यावर होते. यावेळी संशय आल्याने त्यांनी उद्धव भोसले यांच्याकडे गाडीची कागदपत्रे मागितली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे दोघांना ताब्यात ते घेऊन पोलिस स्टेशनकडे घेऊन जात होते. तेव्हा उद्धव भोसले आणि पत्नी कुंदनबाई भोसले यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. उद्धव यांच्या पत्नीने सचिन पवार यांना रस्त्यावर पडलेल्या फळीने मारण्यास सुरुवात केली. तर उद्धव यांनी सचिन पवार याच्या हाताला चावा घेतला. पोलिसांनी त्या दाम्पत्याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


bottom of page