top of page
Writer's pictureMahannewsonline

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ११ टक्क्यांची वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वीच केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढीसह थकबाकी देण्यास संमती दिली होती. मात्र, निर्णय कधी होणार याकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं होतं.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महागाई भत्त्यात तब्बल ११ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्क्यांवर गेला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याचे तीन हफ्ते प्रलंबित असून, सप्टेंबरपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.



bottom of page