top of page
Writer's pictureMahannewsonline

ग्राम दाढी अंगणवाडी तर्फे पोषण आहार महासप्ताह संपन्न

बीड : जिल्ह्यातील ग्रामपंचायत दाढी येथील अंगणवाडी केंद्र व पूर्व माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान शासकीय पोषण महा सप्ताह राबविण्यात आला. या महासप्ताहादरम्यान अनेक विविध जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.,सरपंच सुनीता येवले, अंगणवाडी सेविका अर्चना लेंडे ,अंगणवाडी सहाय्यक संगीता तेलमोरे, पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका ज्योत्स्ना शेटे , देशमुख, विद्यार्थ्याचे पालक व गावातील नागरिक या सर्वांनी ग्राम दाढी बीड येथील प्रत्येककाला पोषण आहारावरील महत्त्व समजून सांगितले.

यावेळी रांगोळी स्पर्धा, मैदानी स्पर्धा आहार प्रात्यक्षिक, संपूर्ण गावातून रॅली काढून त्यामध्यामातून नारे देत सही पोषण,बेटी बचाव बेटी पाढव,मुलगा मुलगी भेद नको,मुलगी झाली तरी खेद नको,झाडे लावा झाडे वाचवा गावातील नागरिकांना त्यामाध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला. तसेच गावातील वयोवृद्ध नागरिकांचे वाढदिवस ,सायकल रॅली, शेवग्याच्या झाडाचे वृक्षारोपण, घोषवाक्य स्पर्धा, योग्य शिबीर तसेच माझी मुलगी माझा अभिमान आणि गावातील ज्यांना एक मुलगी व दोन मुले आहेत अशा आई-वडिलांचा अंगणवाडी सेविका अर्चना लेंडे यांच्या वतीने व उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा सरकारी माध्यमिक शाळेचे शिक्षक वृंद यांच्या उपस्थित शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अनेकांनी आपले जनजागृती बद्दल मनोगत व्यक्त करून कशाप्रकारे सुखी समृद्ध जीवनाची वाटचाल आपण करू यासंबंधी संबोधित केले.


bottom of page