top of page
Writer's pictureMahannewsonline

'शिवतीर्थ'वर नाही तर 'या' ठिकाणी होईल शिवसेनेचा दसरा मेळावा

दरवर्षी दसऱ्याला शिवसेनेकडून मेळाव्याच आयोजन करण्यात येतं. या मेळाव्याला राज्यभरातील शिवसैनिक उपस्थित राहत असतात. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षी हा मेळावा ऑनलाइन पद्धतीने भरवण्यात आला होता. कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने यावर्षी हा दसरा मेळावा ऑनलाईनन होता ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. यापूर्वी शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावेचे आयोजन करण्यात येत होते. मात्र यंदाचा मेळावा शिवाजी पार्कवर न होता मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

या मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसंच महापौर उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा हा पक्षापुरता मर्यादित नसून त्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं असतं.


bottom of page