top of page
Writer's pictureMahannewsonline

भीमा नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

पुणे : अंघोळ करण्यासाठी भीमा नदीपात्रात गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील दौंड येथे घडली. ही घटना शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे दौंड शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आवेश मुजफ्फर शेख व आदिल मेहबूब शेख हे दोघे अंघोळ करण्यासाठी भीमा नदीवर गेले होते. अंघोळ करण्यासाठी नदीपात्रात उतरल्यानंतर दोन्ही मुलांना पाण्याच अंदाज आला नाही. परिणामी दोघेही पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती होताच नदीशेजारील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांनी पाण्यात बुडत असलेल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुले खोल पाण्यात गेल्यामुळे त्यांना वाचवण्यात अपयश आले आणि दोघांचाही मृत्यू झाला. यावेळी भीमा नदीच्या तिरावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मुलं बुडाल्यामुळे दौंड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम रावबली. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.ही दोन्ही मुले एकमेकांचे नातेवाईक आहेत.


bottom of page