top of page
Writer's pictureMahannewsonline

एका पराभवाने खचू नका

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा 3 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, निवडणूक म्हटलं की जय-पराजय होतच असतो. स्व. भारतनाना भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शक्तीनिशी लढले. अत्यल्प मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या मतदारसंघात पराभवास सामोरे जावे लागले.


राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके हे नवखे आणि तरुण उमेदवार होते. भगीरथ भालके यांना मिळालेली मते कौतुकास्पद आहेत. भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या एका पराभवाने खचू न जात अधिक जोमाने लोकांची कामे करावीत.‌ या निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल समाधान आवताडे यांचेही अभिनंदन करतो. आता निवडणूक संपली आहे. प्रत्येकांनी राजकारण विसरून कोरोना विषाणूला हरविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. वारंवार हात धुवावेत. आणि अधिकाधिक लोकांनी लस टोचून घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.


bottom of page