top of page
Writer's pictureMahannewsonline

शिक्षक हा विद्यार्थी नाही तर देश घडवत असतो... : दिनेश चोखारे

शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेत जाऊन केला शिक्षकांचा सत्कार

चंद्रपूर :शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार, मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. शिक्षक हा विद्यार्थी नाही तर देश घडवत असतो. शाळेत शिक्षकांकडून  मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याचे मत जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांनी व्यक्त केले.

दिनेश चोखारे यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल  ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांचा सत्कार त्यांच्या शाळेत जाऊन करण्यात आला.

ते पुढे बोलतांना म्हणाले कि,  विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो, शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार, मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण. शिक्षक हा विद्यार्थी नाही तर देश घडवत असतो. आज शिक्षकाकडे कामाचा बोझा वाढत असला तरी ते विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करत नाही तर त्याचे जीवन कसे सुखरूप होईल हेच त्याचे उद्देश असते. त्यांना कोणत्याही अडचणी येऊ देणार नाही. त्यांना सत्व अडचणींचा सामना कसा करायचा हे शिकवितात. त्याचे   योगदान आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.

यावेळी भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, चंदनखेडा, येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा सहभाग असून येथील मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला

यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घोडपेठ येथे काँग्रेसचे कामगार नेते पवन आगदरी, ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल खडके,  उपसरपंच प्रदीप देवगडे, गटनेते ईश्वर निखाडे, भद्रावतीच्या काँग्रेस महिला कमिटीच्या उपाध्यक्षा ग्रापंपचायतीच्या सदस्या ज्योती मोरे, सामाजिक कार्यकते अशोक येरगुडे, विनोद मुडपल्लीवार, यांचेसह सत्कारमुर्ती केंद्र प्रमुख यशवंत महाल्ले , मामीडवार, हर्षवर्धन उराडे शाळेच्या मुख्याध्यापिका कु. नंदा उरकुडे, कु. नेत्रप्रभा रघाताटे, डॉ. वैशाली वडेट्टीवार, शिक्षणप्रेमी भाग्यश्री केराम, सुजाता खडके, यांची उपस्थिती होती.

चंदनखेडा येथे ग्रामपंचायतीचे सरपंच नयन जांभुळे, शाळा समिती अध्यक्ष अनिल कोकुडे, माजी उपसरपंच विठ्ठल हनुवते, ग्रामपंचायत सदस्य निकेश भागवत, रवींद्र मेश्राम, प्रमोद लाखे, यांचेसह सत्कारमूर्ती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आईंचवार मॅडम, कुंभारे, सौ. कुंभारे, सौ. गुडममवार, अरविंद मेश्राम , सुखदेव मेश्राम , लोंढे, गायकवाड यांची उपस्थिती होती.

घोडपेठ, चंदनखेडा, येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षक, शिक्षकांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.यावेळी गावातील नागरीक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

bottom of page