top of page
Writer's pictureMahannewsonline

सावधान ! नाशिकमध्ये आढळले डेल्टा व्हेरिएंटचे ३० रूग्ण

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असतानाच नाशिकमध्ये ३० जणांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे समोर आले असून, यापैकी २८ रूग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. नाशिकमध्ये डेल्टाचा व्हेरिएंट आढळल्याने आरेाग्य विभागाची चिंता वाढली आहे.

कोरेाना पॉझिटिव्ह संशयित १५५ रुग्णांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले हेाते. शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला त्याचा अहवाला प्राप्त झाला असता ३० रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग आढळून आला. यामध्ये दोन रुग्ण नाशिक शहरातील तर अन्य रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. सिन्नर, निफाड, नांदगाव, चांदवड या तालुक्यांमध्ये डेल्टाने शिरकाव केल्याचे समोर आले आहे.


सर्वप्रथम भारतात आढळलेला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार जगातील १३५ देशांमध्ये झाला आहे. तर,८१ देशांमध्ये गामा व्हेरिएंट आणि अल्फा व्हेरिएंट १८२ देशांमध्ये पसरला आहे.


bottom of page