top of page
Writer's pictureMahannewsonline

डेल्टा प्लस व्हेरिएंट सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा विषाणू ; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा!

भारतातही डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता वाढली असतानाच आता जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंट जगभरात आजपर्यंत सापडलेल्या विषाणूंमध्ये सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा विषाणू असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे प्रतिकारशक्ती वेगाने निष्प्रभ होत असल्याचं समोर आलं आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या जगभरातल्या नागरिकांनी देखील मास्क घालून ठेवणं आवश्यक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचं गांभीर्य विषद केलं. डेल्टा व्हेरिएंटचे जगातल्या जवळपास ८५ देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत सापडलेल्या करोना व्हेरिएंटमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा प्रकार आहे. आपण सगळ्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि कोरोनासंदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. त्यासोबतच या विषाणूला थांबवायचं असल्यास जगातल्या सर्वच देशांमध्ये समान पद्धतीने लसींचा पुरवठा व्हायला हवा”, असं टेड्रॉस यावेळी म्हणाले.

जेवढं या विषाणूचं संक्रमण आपण कमी करू, तेवढे त्याचे व्हेरिएंट कमी असतील, असं ते म्हणाले. त्यासाठी व्यापक लसीकरणाची गरज त्यांनी व्यक्त केली. हे लसीकरण जगातल्या सर्वच देशांमध्ये व्हायला हवं, अस त्यांनी नमूद केलं.



bottom of page