top of page
Writer's pictureMahannewsonline

महाराष्ट्रात लोकशाहीच्या ऐवजी "लॉक"शाही सुरू आहे…

राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याचे संकेत दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत बैठक घेतली. लॉकडाउनबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत लॉकडाउनचा निर्णय घेतला जाण्याची चिन्हे आहेत. दरम्यान यावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आलं असं सांगून राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली.


'देशात करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. करोनाचा सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रात आहे. करोना रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत. अशी अवस्था या सरकारनं महाराष्ट्राची करून ठेवली आहे,' असं ते म्हणाले.


“आम्ही नेहमी म्हणायचो महाराष्ट्रात लोकशाही आहे, पण आता लोकशाहीऐवजी "लॉक"शाही सुरू आहे…म्हणजेच लॉकडाउन”. “कधी लॉक करायचं…कधी अनलॉक करायचं…ठीक आहे तेदेखील आवश्यक असतं. परंतू जेव्हा आपण जेव्हा अशाप्रकारे लॉकडाउन करतो, लोकांचा रोजगार जातो तेव्हा किमान त्या लोकांना दिलासा म्हणून आपल्या तिजोरीतून २ रुपये दिले पाहिजेत. याचं मात्र सरकारला कुठेही भान दिसत नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड या शेजारच्या राज्यांत तिथल्या सरकारांनी करोना काळात सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना मदत केली. वीज बिलं माफ केली. सवलती दिल्या. मुळात सरकार असतं कसासाठी? अडचणीत मदत करण्यासाठी. मात्र, राज्यातलं ठाकरे सरकार हे सावकारांपेक्षाही भयंकर आहे,' अशी तोफ फडणवीसांनी डागली.

bottom of page