top of page
Writer's pictureMahannewsonline

सरकारने गंभीरतेने विचार करायला हवा होता...

महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ १० मानाच्या पालख्यांनाच वारी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. या १० पालख्या २० बसेसच्या माध्यमातून पंढरपुरात पोहोचणार आहेत. पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून वाखरी ते पंढरपूर पोलीस बंदोबस्तात पायी वारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “कमी उपस्थितीत पायी वारी करणे शक्य होते. सरकारने गंभीरतेने विचार करायला हवा होता!” असं म्हटलं आहे.

कमी उपस्थितीची पायी वारी करता येणं हे शक्य होतं. थोडा सरकारने जर विचार केला असता. तर निश्चितपणे, कारण त्यांची जी मागणी होती की, केवळ ५० लोकांची आम्हाला परवानगी दिली जावी. यासोबत त्यांनी मार्गावरील सगळ्या गावांचे ठराव घेतले आहेत, की गावातून कुणीही रस्त्यावर येणार नाही. त्यामुळे इतकं शिस्तीत जर जे काम होतं. तर त्यांचा गंभीरतेने विचार सरकारने करायला हवा होता.असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.


bottom of page