top of page
Writer's pictureMahannewsonline

रोज काय होत आहे हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत...

उद्धव ठाकरे आणि के चंद्रशेखर राव भेटीवरही दिली प्रतिक्रिया



रोज काय होत आहे हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. राणेंवर काय कारवाई झाली, त्यांच्या मुलांवर काय कारवाई झाली, किरीट सोमय्यांचा कसा जीव घेण्याचा प्रयत्न सुरु आहे, रवी राणा, या सगळ्या गोष्टी जनता पाहत आहे. सुडाचं राजकारण कोण करत आहे हे माहिती आहे. त्यांची निराशा सुडाच्या राजकारणातू बाहेर येत असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भेटीसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, “मी पत्रकार परिषद ऐकली नाही. पण एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री येऊन एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना येऊन भेटणे यात काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असतानाही तेलंगणचे मुख्यमंत्री भेटण्यासाठी आले होते. त्यामुळे याच्यात फार काही वाटत नाही”.

भाजपाच्या विरोधाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल असं यावेळी सांगण्यात आल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “या सगळ्या मंडळींनी मागील लोकसभेतही हातात हात घालून मोठी आघाडी तयार केली. पण त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशासह देशाच्या विविध राज्यांमध्ये त्यांनी हा प्रयोग करुन पाहिला. कुठेही याचा परिणाम झाला नाही. “खरं म्हणजे तेलंगणात आता टीआरएसची स्थितीच वाईट आहे. मागील लोकसभेत भाजपाच्या चार जागा निवडून आल्या, पुढील लोकसभेत तेलंगणामध्ये भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल,” असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.

राणेंच्या मुंबईतील बंगल्यावरील कारवाईसंबंधी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “जे सुडाचं राजकारण सरकारला करायचं असेल ते करेल. न्यायालय आहेत ते योग्य तो निर्णय घेतील”. “रोज काय होत आहे हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. राणेंवर काय कारवाई झाली, त्यांच्या मुलांवर काय कारवाई झाली, किरीट सोमय्यांचा कसा जीव घेण्याचा प्रयत्न सुरु आहे, रवी राणा या सगळ्या गोष्टी जनता पाहत आहे. सुडाचं राजकारण कोण करत आहे हे माहिती आहे. त्यांची निराशा सुडाच्या राजकारणातू बाहेर येत आहे”, असं

फडणवीस यांनी यावेळी सांगितले


bottom of page