top of page
Writer's pictureMahannewsonline

योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करायचाच आहे, पण ...

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. “तुम्ही आवताडेंना निवडून द्या, योग्यवेळी या सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो, असं बोललो होतो. आजही मी त्या वक्तव्यावर कायम आहे. योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करायचाच आहे. पण आता मात्र कोरोनाशी लढाई करायची आहे. ही वेळ नाही. आता आम्ही आमचे श्रम कोरोनाच्या लढाईच्या पाठीशी उभे केले आहेत”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

मी पंढरपूरच्या मतदारांचे मनापासून आभार मानतो की, भारतीय जनता पक्षावर तिथल्या जनतेने विश्वास दाखवला आणि मागील दीड वर्षातील महाविकास आघाडीच्या गैर कारभाराला, गलथान कारभाराला, भ्रष्टाचारी कारभाराला एक प्रकारे आरसा दाखवण्याचं काम हे पंढरपूरच्या जनतेने केलं आहे. या निवडणुकीत राज्य सरकारचे तीन पक्ष उतरले. साम-दाम-दंड-भेद अशा सगळ्या पद्धती अवलंबले. त्यांनी प्रशासनाचा गैर उपयोग केला. मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर केला पण हे सगळं केल्यानंतर देखील, त्या ठिकाणी भाजपाला जनतेने निवडून दिलं आहे, .असही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आमचे उमेदवार समाधान आवताडे यांचं अभिनंदन करतो. जमिनीशी जुळलेले व्यक्तीमहत्व म्हणून ते गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत प्रशांत पारिचारक आणि उमेश पारिचारक हे देखील राम-लक्ष्मणाप्रमाणे त्यांच्यासोबत उभे राहिलेत. रणनिती आखून ही निवडणूक लढवली गेली”, असं फडणवीस म्हणाले.



bottom of page