top of page
Writer's pictureMahannewsonline

महाराष्ट्रातील ड्रग्जचा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर...

नवाब मलिक यांनी केले गंभीर आरोप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरुन ड्रग्जचा खेळ सुरू असल्याचा दावा मलिक यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय मंत्री संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांचा एक वजीर याच शहरात राहतो. त्याचं नाव निरीज गुंडे असं आहे. फडणवीस सरकारच्या काळात त्याला मुख्यमंत्री निवास, मुख्यमंत्री कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश होता. सर्व पोलिसांच्या बदल्या तो ठरवत होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील तोच ठरवायचा.” असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

'जयदीप राणा यांचा फोटो मी ट्विटरवर शेअर केला आहे. एका मराठी वेब पोर्टलनं दिलेल्या बातमीत त्यात वर्मा नावाच्या व्यक्तीने ही माहिती दिली आहे. मी फोटो ट्वीट केलेला व्यक्ती जयदीप राणा आहे. तो सध्या साबरमती जेलमध्ये आहे. राणाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संबंध आहेत. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या पत्नीने अमृता यांनी एक गाणं गायलं होतं. नदी संरक्षण अभियानासाठी 'रिव्हर साँग' बनललं होतं. त्यात सोनु निगम व अमृता यांनी गाणं गायलं होतं. तर, त्यात देवेंद्र फडणवीस अभिनय केला होता. या गाण्याला जयदीप राणा यांनी अर्थसहाय्य पुरवलं होतं. राणा हे ड्रग्ज पेडलर आहेत. देवेंद्र फडणवीस व जयदीप राणा यांचे घनिष्ठ संबंध आहेत. जयदीप राणा यांच्यासोबत फडणवीसांचा काय संबंध आहे? याची चौकशी व्हायला पाहिजे असंही मलिक यावेळी म्हणाले.




bottom of page