त्रिवेणी हाईट्स सोसायटीत दिंडी सोहळा
नाशिक : येथील त्रिवेणी हाईट्स को ऑफ हौसिंग सोसायटी येथे आषाढी एकादशी निमित्त विठुमाऊलीची पालखी मिरवणूक आणि रिंगण सोहळा पार पडला. सर्व बालक चिमुकले,महिला, पुरुष विठुरायाचे भजन गात सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी बाल वारकरींनी विठ्ठल रूखमाई तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडीत सहभागी होत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील परंपरेचा वारसा जपत दिंडीमध्ये विठू नामाचा गजर केला.
याप्रसंगी चेअरमन मनोहर जगताप यांनी विठुरायाच्या नामाचा महिमा आणि विठ्ठलाच्या भक्तीचा मार्ग हा सर्वांना उत्साह देणारा असून यामुळे जीवनात चैतन्य निर्माण होते अशी माहिती जगताप यांनी दिली. याप्रसंगी श्रेयस वानखेडे, अन्वेष आवारी, परी बुवा,सृष्टी सतोटे, यांनी विठोबा रखुमाई वेशभूषेत तर प्रमित लोखंडे, अथर्व जगताप यां चिमुकल्यानी अभंग गायन करत सर्वाना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी चेअरमन मनोहर जगताप, सचिव अमित वानखेडे, रवींद्र आवारे, पंढरीनाथ उगले, दिलीप गीते, अशोक ढगे,महेंद्र बुवा, प्रदीप साटोटे,अनिकेत मोरे, अमित लोखंडे, एकनाथ महाले, रोहित जगताप, संजय कदम, विश्वनाथ सूर्यवंशी ,पूनम गोसावी, वर्षा मोरे,तसेच मोठ्या संख्येने महिला व बाल वारकरी होते.समारोप प्रसंगी दिंडीत सहभागी नागरीकांना फराळ वाटप करण्यात आले.सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.